नमस्तेस्तु महामाये श्री पीठे सुर पूजिते!
शंख चक्र त्रिशूल हस्ते जीवदानी नमोस्तुते!!
श्री पीठावर स्थित असलेल्या आणि देवतांकडून पुजल्या जाणाऱ्या हे महामाये, तुला नमस्कार असो. हातात शंख, चक्र आणि त्रिशूळ धारण करणारी जीवदानी माते, तुला नमस्कार असो.
पालघर तालुक्यातील विरार रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला डोंगरावर जीवदानी माता वसली आहे. जीवदानी मातेचं मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत प्राचीन आहे. या मंदिराची निर्मिती पांडवांनी वनवासात असताना केल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील एका गुफेत पाच पांडवांनी देवीची स्थापना केली होती. हे स्थान पांडव डोंगरी सदृश बनवलं गेलं आणि हे स्थान योगी, संत आणि ऋषी यांचं निवासस्थान होतं. आजही अनेक योगीपुरुष आणि ऋषी देवदर्शनादरम्यान मंदिर परिसरात निवासाला असतात.
अधिक वाचा