श्री पीठावर स्थित असलेल्या आणि देवतांकडून पुजल्या जाणाऱ्या हे महामाये, तुला नमस्कार असो. हातात शंख, चक्र आणि त्रिशूळ धारण करणारी जीवदानी माते, तुला नमस्कार असो.
विरार रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या एका डोंगरावर जीवदानी माता विराजमान आहेत. जीवनदानी मातांचे हे मंदिर ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत प्राचीन मानले जाते. असे म्हटले जाते की पांडवांनी वनवासात असताना या मंदिराची स्थापना केली होती. येथे एका गुहेत पाचही पांडवांनी देवीची स्थापना केली होती. या स्थळाला पांडव डोंगरीसारखे बनवले होते. हे ठिकाण योगी, संत आणि ऋषींचे निवासस्थान होते. आजही अनेक योगी आणि ऋषी देवीच्या दर्शनादरम्यान मंदिराच्या आवारात काही काळासाठी निवास करतात.
श्री जीवदानी देवीचे मंदिर होते. चिमाजी आप्पांच्या सरदाराने जिंकलेल्या "जीवदन" किल्ल्यावरून डोंगराला जीवदानीचा डोंगर असे नाव पडले. डोंगरावरील देवीच्या दर्शनासाठी पूर्वी पायवाट होती. सुमारे ३५० वर्षांपूर्वीचे हे मंदिर असावे असा ठाणे गॅजेटमध्ये उल्लेख आहे. आज या देवस्थानाचा संपूर्ण कायापालट झाला असून महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान म्हणून त्यांचा लौकिक आहे.जीवदानीमातेचे वास्तव्य गडावर केव्हा पासून झाले हे कोणीही सांगू शकत नाही कारण फार पुरातन काळापासून आहे. जीवनदान देवीची महाभारत आधीचे आहे. पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात जीवधन डोंगरावर वास्तव्य केले होते, असे म्हणतात, आणि त्यांनी तेथे जीवनदानी देवीची स्थापना केली असावी. जीवनदान गडावर पांडवकालीन शिल्प असावेत
आज जीवदानीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गडावर १७ व्या शतकाच्या सुमारास जीवधन नावाचा किल्ला अस्तित्वात होता. महाराष्ट्रात जंजिरा, गडकोट व भुईकोट किल्ले आहेत त्यापैकीच हा एक गडकोट किल्ला होता. आज तटाचे काही कोरीव दगड भग्नावस्थेत आढळतात. मराठा सैनिकांच्या ताब्यात असलेल्या या किल्ल्यावर २७ मार्च १७३१ रोजी फिरंगी सरदाराने चढाई केली. गडावर केवळ १०० मराठे होते. फिरंग्यांच्या सैन्यापुढे टिकाव लागणार नाही म्हणून ते अन्य दुर्गम अशा मार्गाने किल्ला सोडून निघून गेले. फिरंगी अमलात हिंदूना बाटवून ख्रिस्ती करणाचे काम मोठ्या प्रमाणात होत असे. त्याला प्रतिबंध बसावा म्हणून हिंदूंनी धर्मसंरक्षणार्थ पेशव्यांकडे मदतीची अपेक्षा केली. चिमाजी आप्पाने बरवाजी ताकपीर या सरदारास जीवधन किल्ला काबिज करण्यास पाठविले. त्याने ३०० सैन्यांनिशी ३१ मार्च १७३९ रोजी किल्ला सर केला. टेहेळणीसाठी मोक्याची जागा म्हणून या किल्ल्याला ऐतिहासिक असे महत्त्व होते. त्यानंतर अनेकवर्षे हा किल्ला उपेक्षित राहिला. कालौघात किल्ल्याचे अस्तित्व नष्ट झाले.
२३ फेब्रुवारी १९५६ मध्ये ए/ ३९७ ठाणे या क्रमांकाने श्रीजीवदानी देवी ट्रस्ट अस्तित्वात येऊन बारकीबाय ह्या एकमेव विश्वस्त झाल्या. पुढील १५-२० वर्षात काही विश्वस्तांची त्यात भर पडली. १९८१ मध्ये तत्कालीन राज्यमंत्री ताराबाई वर्तक यांच्या प्रयत्नाने विश्वस्त मंडळाचा विस्तार करण्यात आला. तेव्हापासून खऱ्या अर्थाने ट्रस्टच्या कामाला सर्वव्यापी गती प्राप्त झाली.